Saturday, 21 November 2015

एक आठवण

एक आठवण

रात्रीचे १२ वाजले आहेत, मनात काहीतरी हुरहूर चालू होती कारण नुकताच पार्टी करून आलो होतो निमित्त होते ठाकूर च्या परदेश पार्टीचे, आज ८ वर्ष झाली इंगीनीर होऊन सगळे आपापल्या संसारात आणि कामात व्यस्त तरी सुधा निमित्त काढून भेटणे म्हणजे पार्टी करणे हे आमचे रेगुलर ,तसा आमचा हा पार्टी ग्रोउप म्हणजे झक्कास त्यात लल्या,बिपीन,ठाकूर आणि बोरसे अण्णा ,त्यात बोरसे अण्णा आमच्यात एक वेगळे व्यक्तिमत  खास पार्टी ला मुंबई वरून येणे,खरच मैत्री कशी ओढून आणते त्याचे  एक उत्तम उदाहरण त्याला कारण हि तसेच राहायचे जुन्या आठवणी त्याच्या करणे .

आजची पार्टी म्हणजे मी ,लल्या आणि ठाकूर आम्ही तिघेच ,पण मला जाणवत होते आता लल्या आणि ठाकूर जातात आहेत ते सुद्धा ३-४ वर्षासाठी आणि काहीच दिवसापूर्वी बिपीनने  सुद्धा MSEB group जॉईन केला, आता  पुण्यात ग्रोउप मधले कोणीच राहणार नाही आणि group मधला धुमकेतू म्हणजे योग्या तो आहे पण कधीच संपर्कात न राहणारा  , माझ्या संपर्कात राहणारा  म्हणजे लल्या नेहमी फोन करणे,motivate करणे आणि वेळोवेळी मदत करणे.   मला नव्हे तर आमच्या group मध्ये सगळ्यांना धरून चालणारा ,तसे आम्ही कधी कधी त्याची खेचतो सुधा, कारण आमच्या मध्ये तो सगळ्या गोष्टी मध्ये पुढे असतो , पण आता सगल्याना परदेशी जाण्याची ओढ लागली होती . आपली कोंकण trip म्हणजे एक आपल्या मैत्रीतील सुवर्ण वेळ , आपल्या कसबा पेठेतल्या आठवणी भरपूर आहेत , लिहायला गेलो तर एक पूर्ण खंड लिहू शकेल पण पिलेलो आहे ना उगाच सेंटी मारण्यात काही अर्थ नाही, नाहीतर उद्या उलटे comments  पडतील , थोड पांचट आणि बोध घेण्या सारख्या ओली आहेत माझ्या मित्राने लिहिलेल्या

- जीवन नेहमी तुझ्याकडे दोन गोष्टी फेकेल, गु आणि कलाकंद. तुला काय झेलायचे आहे हे तुझ्यावर आहे.
- सगळे समजून घेण्याचा विचार किंवा प्रयन्त करू नका. फक्त तुम्हाला काय पाहिजे ह्याचा विचार करा, फायद्यात रहाल.
- गुवात जास्त वेळ काडी फिरवू नका, काडी लवकर फेका आणि गुवावर माती टाका. थोडक्यात जीवनात रडत बसू नका, लवकर पुढे जा.
- अधून मधून मित्रांचे दरवाजे ठक-ठक करायचे, काय माहित त्याला तुमची गरज असेल किंवा तुम्हाला त्याची.

लिहिलेला लेख आवडला असेल तरी प्रतिक्रिया देवू नका

1 comment:

  1. KK group kadhi tutnaar nahi lakshaat thev... hey sagde temporary changes aahey... Cheers..

    ReplyDelete